भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

सर्व देशीं सर्व जीवीं तो हरी । सर्वाठायीं सर्व भावें सर्व मुरारी ॥१॥ सर्व गांवी सर्व रुपीं भरुनी उरला । सर्व व्यापक सर्वां भूतीं तो व्यापला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें मुळ खुंटें ॥१॥ म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्व भावें सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ॥१॥ ऐसा अनुताप घडतां मनासी । भजन तें सुखासी येत स्वभावेंची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥ विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलांचें नाम । दुजा नाहीं काहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वकाळ सुख रामनामीं । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि ॥१॥ जागृती सुषुप्ती रामनाम ध्यान । कार्य आणि कारण रामनामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥१॥ माझें मज दावियलें माझें मज दावियलें । उघडें अनुभविलें परब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वभावें तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१॥ तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वभावें दास होती सदगुरुचे । धन्य भाग्य तयाचें काय वानूं ॥१॥ पार नाहीं सुखा तयांचिया दैवा । वांचुनी केशवा भक्ति नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां ॥१॥ मोक्षसुख आम्हां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ