भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व महाराजाचा रावो । विटेवरी पंढरीरावो

sarva maharajacha ravo | vitevari pandhariravo

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व महाराजाचा रावो । विटेवरी पंढरीरावो ॥१॥ तया न जाती हे शरण । दीना घालिती लोटांगण ॥२॥ तारा म्हणतीं आम्हांसी । ऐसें अभागी ते दोषी ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं भाव । तया अवघेंचि वाव ॥४॥