भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वभावें तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें

sarvabhaven tuj alon mi sharan | bhetavi nidhan vaikunthichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वभावें तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१॥ तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागीं ॥२॥ तुम्ही संत उदार सोइरे निजाचे । दरुशन तयाचें मज करवा ॥३॥ एका जनार्दनीं ऐशी भाकी कींव । अभिमान सर्व दुरी गेला ॥४॥