भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलांचें नाम

sarvakal jyancha nem | vachen shriviththalanchen nam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलांचें नाम । दुजा नाहीं काहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥ धन्य पुण्य तया साचें । नामस्मरण नित्य वाचे । त्रीअक्षरीं नाम वाचें । धन्य त्यांचे पुण्य तें ॥२॥ ऐसा साधे जया नेम । तया सोय राखे आत्माराम । एका जनार्दनीं परम । प्रिय तो देवाचा ॥३॥