भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वभावे जे झाले उदास । धरुनियां आस कीर्तनीं

sarvabhave je jhale udas | dharuniyan as kirtanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वभावे जे झाले उदास । धरुनियां आस कीर्तनीं ॥१॥ सर्व काळ सर्व वाचे । सर्व साचें कीर्तन ॥२॥ सर्वां देहीं सर्व वेदेहीं । सर्वां वदवीं कीर्तन ॥३॥ सर्व मनीं सर्व ध्यानीं । सर्वां ठिकाणीं कीर्तन ॥४॥ सर्व देशीं सर्व गांवीं । एका भावीं कीर्तन ॥५॥