भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वभावें दास होती सदगुरुचे । धन्य भाग्य तयाचें काय वानूं

sarvabhaven das hoti sadaguruche | dhanya bhagya tayachen kay vanun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वभावें दास होती सदगुरुचे । धन्य भाग्य तयाचें काय वानूं ॥१॥ पार नाहीं सुखा तयांचिया दैवा । वांचुनी केशवा भक्ति नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं सर्वभावें शरण । तनुमनधन वोवाळावें ॥३॥