भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

सबाह्य अभ्यंतरीं देव आहे हा निर्धार । करुनी सत्वर मार्ग धरी ॥१॥ नुठवी सापत्न माता ऐसा धरुनी हेत । चालिला त्वरित वनालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं ॥१॥ वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समचरणीं उभा चैतन्याचा गाभ । त्रैलाक्याची शोभ पांडुरंग ॥१॥ भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाची विधान पाडुंरग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें । हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

समसृष्टीं । म्हणो नये थोर सान । ऐसें उपदेशी ज्ञान । आपण ही गोष्टीं ॥१॥ काया वाचा मनें भावें । संतांशीं शरण जावें । संगती ते जीवेंभावें । अंतरीची गोष्टी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समाधि निवृत्ति म्हणतां । हारे संसाराची व्यथा ॥१॥ दृष्टीं पाहातां निवृत्तिनाथ । काय भय नाहीं तेथ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोण्हाकाळीं ॥१॥ समुद्रा भरितें पर्वसंबंधे । योगी परिपूर्ण परमानंदें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समुद्रवलयांकित तीर्थ । स्नानें करती जे पवित्र । परी तेथें नसतां भाव । निर्फळ वाव होतसे ॥१॥ ऐसा निर्णय शास्त्री । पुराणीं सांगतसे व्यक्ति । तेचि उघड सर्वाप्रती । सांगतसें परियेसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समुद्रवलयांकित पृथ्वी पाहतां । ऐसें तीर्थ सर्वथा नाहीं कोठें ॥१॥ भाविकांचें माहेर जाणा पंढरपुर । विठ्ठल विटेवर उभा असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

समुळ मुळीं पाहतां पाहण्या उपरम । भोग भोक्ता तेथें सहज परब्रह्मा ॥१॥ भोगुं मी काय त्यागुं मी काय । त्याग भोग दोन्हीं चैतन्य माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्पें दर्दुर धरियेला मुखीं । तोही मक्षिका शेखीं धरीतसे ॥१॥ तैसें ते अभागी नेणतीच काळ । वाउगा सबळ करिती धंदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्पे धावोनि धरिल्या तोंडीं । सर्वांगा घालितसे बेडी ॥१॥ सर्पबाधेची सांकडीं । निवारी मंत्रवादी गारुडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ