भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधि घेतली आळंदी । भोंवतीं शोभे सिध्द मांदी

samadhi ghetali alandi | bhonvatin shobhe sidhda mandi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समाधि घेतली आळंदी । भोंवतीं शोभे सिध्द मांदी ॥१॥ सन्मुख पुढें अजानवृक्ष । देव येती तेथें साक्ष ॥२॥ कीर्तन गजरीं । नामघोष चराचरी ॥३॥ ऐसा सोहळा आनंद । एका जनार्दनीं नाहीं भेद ॥४॥