भजनी मालिका
← भजनांकडे परत

समचरणीं उभा चैतन्याचा गाभ । त्रैलाक्याची शोभ पांडुरंग

samacharanin ubha chaitanyacha gabh | trailakyachi shobh pandurang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समचरणीं उभा चैतन्याचा गाभ । त्रैलाक्याची शोभ पांडुरंग ॥१॥ भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाची विधान पाडुंरग ॥२॥ मुक्ति कल्पद्रुम महाफळ उत्तम । गोपिकांचा काम पाडुंरग ॥३॥ एकाएकी विनटला । तो सदा संचला । एका जनार्दनीं भेटला पांडुरंग ॥४॥