भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्प बिळामाजीं रिगें । हें तो देखतीक सवेगें

sarpa bilamajin rigen | hen to dekhatik savegen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्प बिळामाजीं रिगें । हें तो देखतीक सवेगें ॥१॥ तैसा योगियांचा योग । सर्पापरी भूमी व्यंग ॥२॥ दावितां आचारू । हासताती लहान थोरू ॥३॥ म्हणती एक कर्मठ । ऐक म्हणती योगभ्रष्ट ॥४॥ एक निंदिती वंदिती । ऐशी आहे योगस्थिती ॥५॥ यापरीस उत्तम साधन । एका जनार्दनीं शरण ॥६॥