भजनी मालिका
← भजनांकडे परत

सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं

sam ani visham hin to kalachi phalen | bhogilyavin balen na sutati kadhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं ॥१॥ वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥ उसनें आणि ताना जीवा वाटे गोड । देतों तें लिगाड होय मग ॥३॥ एका जनार्दनीं हाही अनुभव । सुखदुःखा ठाव याचपरी ॥४॥