भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

संताचा महिमा देवचि जाणें । देवाची गोडी संतांची पुसणें ॥१॥ ऐसी आवडी एकमेकां । परस्परें नोहे सुटिका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥ अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संताचिया माथां चरणांवरी माझा । देहीं भाव दुजा नाहीं नाहीं ॥१॥ नामांचे चिंतन करिती सर्व काळ । ते माझे केवळ मायबाप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संताचिये घरीं होईन श्वानयाती । उच्छिष्ट तें प्रीति मिळेल मज ॥१॥ तेणें या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ करीन काम ॥१॥ तेणें माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संताचिये पायीं मज पैं विश्रांती । नाहीं माया भ्रांति तये ठायीं ॥१॥ सांगतों तें मनीं धरावें वचन । संतांसी शरण जावें सुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांची आवडे तो देवाचाही देव । कळिकाळांचे भेव पायातळीं ॥१॥ आणिकाची चड नसेची वासना । संताचियां चरणा वाचूंनिया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांची जो निंदा करितो चांडाळ । प्रत्यक्ष अमंगळ हीन याती ॥१॥ तयाच्या विटाळा घ्यावें प्रायश्चित । आणिक दुजी मात नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे ॥१॥ देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचे चरणतीर्थ घेतां । अनुदिनीं पातकांची धुणी सहज होय ॥१॥ संतांचें उच्छिष्ट प्रसाद लाधतां । ब्रह्माज्ञान हातां सहज होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचे ठायीं नाहीं द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाची ॥१॥ संताचें देणें अरिमित्रां सम । कैवल्यांचें धाम उघड तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचे सुख जिहीं अनुबहविलें । ते जीवनमुक्त जहले जन्मोजन्मीं ॥१॥ संतांचा संग जयासी हो जाहला । प्रत्यक्ष घडला सत्यलोक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ