भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गातां नुरेची भेदु । नामस्मरणें ॥१॥ कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राबे त्यांचे घरीं । ऋद्धि सिद्धि कामारी । कोन त्या पुसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतवचनें देव जोडे । सायुज्य मुक्ति पायां पडे । संतवचनें सांकडें । नुरेचि कांहीं ॥१॥ धन्य धन्य संतसंग । उभा तेथें श्रीरंग । लक्ष्मीसहित अभंग । तिष्ठे सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतवचने साधे मुक्ति । संतवचनें बह्मस्थिती । कर्माकर्माची शांती । संतवचनें ॥१॥ संतवचनें याग । संतवचनें सांग योग । संतवचनें अनुराग । घडतां संग संतांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटलें ॥१॥ बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रमक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतसमागमें सुखाची ते राशी । म्हणोनि पायांपाशीं सलगी केली ॥१॥ वंदूं चरणरज घालूं लोटांगण । अभय तें दान संत देती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारी । भव दुःख हरी । संतनामें ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं द्यावय उपमा । ब्रह्मासुखधामा । पुढें नाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या ॥१॥ त्याचिया योगें घडती सर्व । तीर्थ तें पवित्र होतीं तीर्थें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ