भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतां निंदी जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं

santan nindi jo pamar | to durachar janmojanmin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतां निंदी जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं ॥१॥ त्यांसी करितां संभाषण । करावें सचैल तें स्नान ॥२॥ तयांसी येऊं न द्यावें घरां । आपण जाऊं नये द्वारां ॥३॥ एका जनार्दनीं शरण । त्यांचें न पहावें वदन ॥४॥