भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतद्वारी कुतरा जालों । प्रेमरसासी सोकलों

santadvari kutara jalon | premarasasi sokalon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतद्वारी कुतरा जालों । प्रेमरसासी सोकलों ॥१॥ भुंकत भुंकत द्वारां आलों । ज्ञान थारोळ्या बैसलों ॥२॥ कुतरा भुंकत आला हिता । संतीं हात ठेविला माथां ॥३॥ कुतर्‍या गळ्यांची सांखळी । केली संतानी मोकळी ॥४॥ एका जनार्दनीं कुतरा । दांत पाडुनी केला बोथरा ॥५॥