भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसमागमें सुखाची ते राशी । म्हणोनि पायांपाशीं सलगी केली

santasamagamen sukhachi te rashi | mhanoni payampashin salagi keli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतसमागमें सुखाची ते राशी । म्हणोनि पायांपाशीं सलगी केली ॥१॥ वंदूं चरणरज घालूं लोटांगण । अभय तें दान संत देती ॥२॥ पंचमहापातकी विश्वास घातकी । ऐशींयासी निकी संतसेवा ॥३॥ एक जनार्दनीं संतांचा मी दास । अनन्य पायांस न विसंबें ॥४॥