भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा उपकार । सांगावया नाहीं पार

santancha upakar | sangavaya nahin par

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांचा उपकार । सांगावया नाहीं पार ॥१॥ आपणासारिखें करिती । यातिकुळ नाहीं चित्तीं ।२॥ दया अंतरांत वसे । दुजेपणा तेथें नसे ॥३॥ उदारपणें उदार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥