भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या

santancha das to devacha bhakta | tarati patit darushanen tyanchya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या ॥१॥ त्याचिया योगें घडती सर्व । तीर्थ तें पवित्र होतीं तीर्थें ॥२॥ तयाचियां पदें धरा धन्य म्हणे । ऐसे जे भेदरहित मनें तेचि संत ॥३॥ एका जनार्दनीं तयाच्या प्रसादे । कर्मे अकर्मा दोंदें निघताती ॥४॥