भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे

santachi jo nindi devase jo vandi | to nar apadin apada pave

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताची जो निंदी देवासे जो वंदी । तो नर आपदीं आपदा पावे ॥१॥ देवासी जो निंदी संतांसी जो वंदी । तो नर गोविंदी सरता होय ॥२॥ कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्यसदनीं पदवी पावे ॥३॥ एका जनार्दनीं गूज सांगे कानीं । रहा अनुदिनीं संतसंगे ॥४॥