भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचिये पायीं मज पैं विश्रांती । नाहीं माया भ्रांति तये ठायीं

santachiye payin maj pain vishranti | nahin maya bhranti taye thayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताचिये पायीं मज पैं विश्रांती । नाहीं माया भ्रांति तये ठायीं ॥१॥ सांगतों तें मनीं धरावें वचन । संतांसी शरण जावें सुखें ॥२॥ संत तुष्टलिया देवा आनंद होय । मागें मागें धांवे तया पाठीं ॥३॥ एका जनार्दनीं माहेर सुखाचें । घेतलीया वाचे संतनाम ॥४॥