भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचे चरणीं । सुख घेईन मी धणी

santanche charanin | sukh ghein mi dhani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांचे चरणीं । सुख घेईन मी धणी ॥१॥ करीन नीचवृत्ति काम । मना होईल विश्राम ॥२॥ बंधनाची बेडी । तुटेल तयाचीये जोडी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । वासना जाईन करपोन ॥४॥