भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचिये घरीं होईन श्वानयाती । उच्छिष्ट तें प्रीति मिळेल मज

santachiye gharin hoin shvanayati | uchchhishta ten priti milel maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताचिये घरीं होईन श्वानयाती । उच्छिष्ट तें प्रीति मिळेल मज ॥१॥ तेणें या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥२॥ आशा पाश सर्व जातील तुटोनी । जीव हा बंधनीं मुक्त होय ॥३॥ एका जनार्दनीं भाकीन करुणा । श्रीसंतचरणा वारंवार ॥४॥