भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ करीन काम

santachiye dvari hoin dvarapal | na sangatan sakal karin kam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ करीन काम ॥१॥ तेणें माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥ शेष उष्टावळी काढीन पत्रावळी । पूर्वकर्मा होळी सहज होय ॥३॥ एका जनार्दनीं हेंचि पैं मागत । नाहीं दुजा हेत सेवेविण ॥४॥