भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांच्या दरुशनें । तुटे जन्ममरण पेणें

santanchya darushanen | tute janmamaran penen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतांच्या दरुशनें । तुटे जन्ममरण पेणें ॥१॥ ऐसा संतांचा महिमा । बोलतां नाहीं वो उपमा ॥२॥ तीर्थ पर्वकाळ यज्ञ दान । संतचरणीं होती पावन ॥३॥ शरण एका जनार्दनीं । संत पावन इये जनीं ॥४॥