भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्पें दर्दुर धरियेला मुखीं । तोही मक्षिका शेखीं धरीतसे

sarpen dardur dhariyela mukhin | tohi makshika shekhin dharitase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्पें दर्दुर धरियेला मुखीं । तोही मक्षिका शेखीं धरीतसे ॥१॥ तैसें ते अभागी नेणतीच काळ । वाउगा सबळ करिती धंदा ॥२॥ नेणती नेणती रामनाम महिमा । व्यर्थ तप श्रमा शिणती वायां ॥३॥ एका जनार्दनीं तपांचें हें तप । तो हा सोपा जप श्रीरामनाम ॥४॥