भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व कर्म मदर्पण । करितां मन शुद्ध होय

sarva karma madarpan | karitan man shuddha hoy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व कर्म मदर्पण । करितां मन शुद्ध होय ॥१॥ न्य़ुन तें चढतें जाण । करी संपुर्ण मी एक ॥२॥ माझ्या ठायीं ठेवुनी मन । करी कीर्तन आवडी ॥३॥ मन ठेवुनी माझ्या ठायीं । वसो कोठें भलते ठायीं ॥४॥ एकाजनार्दनीं मन । करा मजचि अर्पण ॥५॥