भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां

sarvasukhachi ughadali khani | shrimukh nayanin pahatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां ॥१॥ मोक्षसुख आम्हां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥ धनसुख मज कासया हें पोटीं । पाहिजे लंगोटी सर्वभावें ॥३॥ स्त्रीसुख संसार कासया वेरझार । नको हा पसर मज देवा ॥४॥ एका जनार्दनीं नाशिवंत सुख । पाहतां तुझें मुख इच्छा पुरती ॥५॥