भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी

sarva samogri te bharuni thevili | dvarakesam nirmili sudamapuri

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥ विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथें ॥२॥ एका जनार्दनीं ऐसें करुनी कृत्य । मग जगन्नाथ काय बोले ॥३॥