भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व साधनांचें सार । वाचे उच्चार शिवनाम

sarva sadhananchen sar | vache uchchar shivanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व साधनांचें सार । वाचे उच्चार शिवनाम ॥१॥ न लगे योगाची कसवटी । शिवनाम उच्चार होटीं ॥२॥ घडे जप तप अनुष्ठान । वाचें वदतां शिव जाण ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । शिवनामें जाती पापें ॥४॥