भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वभावें विनवणी । मस्तक चरणीं देवाच्या

sarvabhaven vinavani | mastak charanin devachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वभावें विनवणी । मस्तक चरणीं देवाच्या ॥१॥ सदा रुप पहावें डोळां । वाचे चाळा हरिनाम ॥२॥ निजध्यास कीर्तनाचा । समागम तो संतांचा ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ठाव मागतसे चरणीं ॥४॥