भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वभावें शरणागत । जाहलों निश्चित कृपाळु

sarvabhaven sharanagat | jahalon nishchit krupalu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वभावें शरणागत । जाहलों निश्चित कृपाळु ॥१॥ आतां कळे तैसे करीं । तुम्हीं उदार श्रीहरी ॥२॥ मी आलों असे शरण । कृपा करणें उचितची ॥३॥ शरण एका जनार्दनीं । ऋद्धिसिद्धि तुमचे चरणीं ॥४॥