भजनी मालिका

भजने

कोणा ब्रह्मकर्म कळेना हें वर्म । नासिलें जीवन संध्या वेळें ॥१॥ धरिलें नासिक अनुभवावांचुनीं । त्रिपुटीस पाणी लावियेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥ मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोणाचें घरदार मृगजळ संसार । तुझा तूं विचार करी बापा ॥१॥ सोयरा तूं देव करी पां संसारीं । वायां हाव भरी होऊं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें ॥१॥ पाहातसें वाट येई गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देईल धीर माझ्या जीवा ॥१॥ शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥१॥ कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोणाशीं विचार करावा शेंवटीं । एवढया लाभें तुटी झाल्यातरे ॥१॥ सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गुढ वायां शास्त्र ॥१॥ आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोणासी न कळे हा पंढरीचा राणा । केली विवंचना लग्नाची ते ॥१॥ सहपरिवार आपण निघाला । लग्नाचा सोहळा करीतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कोणासी सांकडें गातां रामनाम वाचें । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥ येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कोणी एकाचिया पोरें केली आळी । ठावे नाही पोळी मागे देखी ॥१॥ बुझाविले हाती देऊनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥१॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोणी एके दिवशीं श्रीकृष्ण अंगणीं । विलोकी नयनीं प्रतिबिंब ॥१॥ मातेप्रती तेव्हां ह्मणतसे हरी । काढोनि झडकरी देईं मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥ आनंदें तयांसी भेटेन आवडी । अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा