भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणासी सांकडें गातां रामनाम वाचें । होय संसाराचें सार्थक तेणें

konasi sankaden gatan ramanam vachen | hoy sansarachen sarthak tenen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कोणासी सांकडें गातां रामनाम वाचें । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥ येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥ अनंततीर्थराशि वसे नामापाशी । ऐसी साक्ष देती वेदशास्त्रें ॥३॥ चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार । राम हा निर्धार जप करीं ॥४॥