भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं

angikar kari tayacha visar | na pade sachar taya lagin

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥ अनाथा कैवारी दीना लोभपर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥ चोखा म्हणे माझी दयाळू माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥