भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां

akhand namachen chintan sarva kal | tenen saphal sansar hoy janan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥ सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥ निर्वाणी तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥ चोखा म्हणे नाम जपें दिननिशी । येणें सदां सुखीं होसी जना ॥४॥