भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसां

adhikar majha nivedan pai | tumhi to gosavi janatasan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसां ॥१॥ अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणीं ॥२॥ कोणीही अंगिकार न करिती माझा । दूर हो जा अवघे म्हणती ॥३॥ चोखा म्हणे तुम्ही घ्याला पदरीं । तरीच मज हरी सुख होय ॥४॥