भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें

koni pandharisi jati varakari | tayanche payanvari bhal majhen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥ आनंदें तयांसी भेटेन आवडी । अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥ ते माझें मायबाप सोयरे सज्जन । तयां तनु मन वोवाळीन ॥३॥ चोखा म्हणे ते माहेर निजाचें । जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥