भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें

konachen chintan karun aisha kalen | payanchiya balen kanthitasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें ॥१॥ पाहातसें वाट येई गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ध्रु.॥ बहुतांचे सत्ते झालों कासावीस । जाय रात्रंदिवस वैरियांचा ॥२॥ तुका म्हणे बैसें मनाचिये मुळीं । तरीं च ही जाळीं उगवतीं ॥३॥