भजनी मालिका
← भजनांकडे परत

अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो

aksharancha shram kela | phala ala tenen to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥१॥ अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥ फळलें तें लवे भारें । पिक खरें आलें तई ॥२॥ तुका म्हणे हा गे देव । पुढें भाव सारावा ॥३॥