भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणी कांहीं तरी म्हणो । आम्ही न जाणो तया बोला

koni kanhin tari mhano | amhi na jano taya bola

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोणी कांहीं तरी म्हणो । आम्ही न जाणो तया बोला ॥१॥ गाऊं सुखें नामावळी । सुख कल्लोळीं सर्वदां ॥२॥ नाचुं संतमेळीं सदा । कीर्तनीं गोविंदा रंजवुं ॥३॥ एका जनार्दनीं हाचि धंदा । वायां शब्दा न लागूं ॥४॥