भजनी मालिका

भजने

क्रोधयुक्त अंतःकरण । तेणें नासे स्वधर्माचरण ॥१॥ ऐसें द्वेषें बांधलें घर । ते ठायीं क्रोध अनिवार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

क्रोधेंयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥ येरु म्हणे जळीं स्थळीं काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारीं विश्रांति कोठें आहे ॥१॥ लक्षचौर्‍यांशींच्या करितां येरझारा । शिणलसि गव्हारा वेळोवेळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥ येई वो येई वो येई लवलाहीं । आलिंगुनि बाहीं क्षेम देई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षणक्षणां देहीं आयुष्य हें काटे । वासना हे वाटे नित्य नवी ॥१॥ माझें मी ह्मणतो गेले नेणों किती । र्मक चक्रवर्ति असं-ख्यात ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्षणक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥ नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥ तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥१॥ तैसे आम्ही नेणों पालटोंचि कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥ ॥ मधील ते वाव अवघी उपाधि । तुम्हां आम्हांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥ समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

क्षीर सागरीचें निजरुपडें । पाहतां पारखिया त्रिभुवनीं न संपडे । तें उभें आहे वाडें कोडें । पुंडलिकाचे आवडी ॥१॥

क्षीरसागर सांडोनि हरि । कीर्तनी उभा सहपरिवारी । लक्ष्मी गरुड कामारी । होती तया कीर्तनीं ॥१॥ आलिया विघ्न निवारी आपण । शंख चक्र गदा हाती घेऊन । सुदर्शन कौस्तुभ मंडित जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

क्षीरसागरांत अससी बैसला । धांवोनी मजला भेटी देईं ॥१॥ कैलासासी शीव पूजितसे तुजला । धांवोनी मजला भेटी देईं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

क्षीरसागरीचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥ कवळी कवळ पहा हो । मुख पसरुनी धांवतो देवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

क्षीरसागरीचें निजरुपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभें असे तें रोंकडें । पंढरीये गोजिरें ॥१॥ पहा पहा डोळेभरी । शंख चक्र मिरवे करीं । कास कसिली पिंताबरीं । हृदयावरी वैजयंती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ