भजनी मालिका

भजने

खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥१॥ आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ते ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खुर्पूं लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥१॥ घडी मडकें कुंभाराचें । चोख्यामेळ्याचीं ढोरें वोढी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥ आतां करी का रे हाकारा । सहस्रनामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खेचरापासी जाय पुससी सागसी तें आहे । येरा आणिका काय उमगेना ॥१॥ जाय जाय वेगीं लवलाहे पाहें । खेचराचे पाय सोडूं नको ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खेचरें केली माव लिंगावरी देउनि पाव । पहावया भाव नामयाचा ॥१॥ नामा तेथें आला देव नमस्कारिला । देखोन बोलला वचन त्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खेद दुःख करी मनाचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां दाटताती ॥१॥ नारा विठा गोंदा पाठविला महादा । साहित्या गोविंदा सांगितलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खेळ खेळ झेंपा गे आठवि चिद्रुपा । नाहिंतरि पुन:पुन्हां न चुकति खेपा ॥१॥ घेंई बारवोटीं गे काढी सागरगोटी । जेणें अर्थ स्वार्थ परमार्थ पडे पोटीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

खेळ खेळुं सुरकवडी । कान्होबा उगाचि पाहे गोडी ॥१॥ एकीबेकी पोरा खेळ भला बेकी । साडुनि एकीबेकी धरितां शेवटीं होईल फुकी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तयां भेऊं नका ॥१॥ नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

खेळ मांडियला गोल्हात शिखरीं । अर्थ चंद्रावरी शेखी याचा ॥१॥ चोवीस त्या गुंफा रुद्रलिंगीं नांदे । अभेद तो वेद बोले तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥ नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे । कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खेळ मांडिला लगोरी । खेळताती नानापरी । चेंडु घेउनि अपुलें करीं । खेळताती एकमेक ॥१॥ देती आपुलाला डाव । ज्याचा जैसा आहे भाव । तोचि जिंकीतसे वैभव । आणिक पहाती उगे वाव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळ मांडिला वो खेळ मांडिला वो । या संसाराचा खेळ मांडिला वो ॥१॥ पंचप्राणांचे गडी वाटिले । तेथें जीवशिव नाम ठेविलें वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळतसे खेळ सवंगडियांसहित । गोपिकांचे हेत पुरवितसे ॥१॥ जयाचिये चित्तीं जे कांही वासना । तेचि नारायण पुरविणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळतां निजभावें समर्थाचे बाळ । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥ तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न चि या नारी तेथें देखियेल्या । मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥ आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ सांडावया भाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंत ॥१॥ माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम