भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेद दुःख करी मनाचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां दाटताती

khed duhkh kari manacha kalavala | premashru dolan datatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खेद दुःख करी मनाचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां दाटताती ॥१॥ नारा विठा गोंदा पाठविला महादा । साहित्या गोविंदा सांगितलें ॥२॥ काय काय आणूं सांगा हें प्रमाण । नेमियेला नेम पांडुरंगें ॥३॥ तुळसी आणि बेल दर्भ आणि फुलें । उदक हें चांगलें भागिरथीचें ॥४॥ नामा म्हणे देवा साहित्य करितां । आठवितें चित्ता खेद दुःख ॥५॥