भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळतां निजभावें समर्थाचे बाळ । तयाच्या सकळ सत्तेखालीं

khelatan nijabhaven samarthache bal | tayachya sakal sattekhalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खेळतां निजभावें समर्थाचे बाळ । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥ तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥ अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी म्हणऊनि ॥२॥ तुका म्हणे माझें ऐसें आहे देवा । म्हणऊनि सेवा समर्पीली ॥३॥