भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंत

khelaton te khel payanchya prasaden | navhati hin chhanden nasivant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंत ॥१॥ माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ध्रु.॥ प्रसादाची वाणी वदें ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥२॥ तुका म्हणे रस वाढितिया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥३॥