भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तयां भेऊं नका

khel navhe bara indra kopaliya | dev mhane tayan bheun naka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तयां भेऊं नका ॥१॥ नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥ गौळियांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥३॥ वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥४॥ नोळखतां दुःखें वाहाती शिरी । तुका म्हणे वरी भारवाही ॥५॥