भजनी मालिका

भजने

गगनपंथें शुभ्र विमानें । देव लक्षिती अधोवदनें । तंव आळकापुरीं कीर्तनें । टाळ मृदांग झणत्कारले ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

गगनामाजीं जैसे शोभे तारांगण । तैसा विटेवरी शोभे समचरण ॥१॥ देखताचि मना समाधान होय । आनंदी आनद होय ध्याती जया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गगनीं ध्रुव तुवां अढळ पैं केला । तो बाळ धाकुला न ह्मणसी ॥१॥ अजामेळाचें तुवां चुकविलें संकट । ब्राह्मण तो नष्ट न ह्मणसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गंगा आली आम्हांवरी । संतपाउलें साजिरीं ॥१॥ तेथें करीन अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गंगा गेली सिंधुपाशीं । त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥ तरी तें सांगावें कवणाला । ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव