भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगा आली आम्हांवरी । संतपाउलें साजिरीं

ganga ali amhanvari | santapaulen sajirin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गंगा आली आम्हांवरी । संतपाउलें साजिरीं ॥१॥ तेथें करीन अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥ पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें ॥२॥ तुका म्हणे धन्य जालों । संतसागरी न्हालों ॥३॥