भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगा गेली सिंधुपाशीं । त्याणें अव्हेरिलें तिसी

ganga geli sindhupashin | tyanen avherilen tisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गंगा गेली सिंधुपाशीं । त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥ तरी तें सांगावें कवणाला । ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥ जळ काय जळचरा । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥ जनी म्हणे शरण आलें । अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥