भजनी मालिका

भजने

गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं ॥१॥ तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गंगा सागरादि तीर्थे भूमीवरी । परि पंढारीची सरी न पवती ॥१॥ श्रेष्ठांमांजी श्रेष्ठ तीर्थ पं समर्थ । दरुशनें मनोरथ पूर्ण होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥१॥ रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥१॥ विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालूं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥१॥ त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गजाचें तें वोझें गाढवासी न साजे । भाविकाचे भजन अभाविका न विराजे ॥१॥ पतिव्रतेची रहाटी सिंदळीसी न साजे । श्रोतियाचें कर्म हिंसक लाजे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गजानन गौरी सूत । लाल अंगपर बभूत । तेरे मुख बचनामृत । उसे जमदूत भागत है ॥१॥ विद्यामरी दुंदुल पेट । उसपर सापकी लपेट । विघन करत है चपेट । पकड फे कालकी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥ सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार । प्रल्हादें असुर उध्दरीलें ॥१॥ हनुमंते जुत्पत्ती रिस आणि वानर । पावविले पार भवसिंधु ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गडयानों राजा कीरे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥ पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं । नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गडियांचे उत्तर ऐकोनी सांवळा वेधियलें मन तटस्थ सकळां ॥१॥ घेउनी मोहरीं गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलें गोपाळा सकळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गडियांसी तेव्हां सांगितलें देवें । स्त्रियांसी सांगावें जाऊनियां ॥१॥ नको कृष्णा द्वीज आम्हांसी मारिती । अभय श्रीपती त्यांसी देत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं आला भेवो यमुनेंत ॥१॥ जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । बाऊ आला आहे तया ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ